प्रत्येकाला मन मोकळं करण्याचा अधिकार, अजित पवार यांच्या 'त्या' वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांचं खोचक प्रत्युत्तर

प्रत्येकाला मन मोकळं करण्याचा अधिकार, अजित पवार यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांचं खोचक प्रत्युत्तर

| Updated on: Jan 08, 2024 | 6:09 PM

८० वय झालं तरी माणूस रिटायर्ड होईना…८४ वय झालं तर तुम्ही थांबना…असे काय चाललंय काय? असा सवाल अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांना विचारला. काही चुकलं तर सांगाना आम्हाला…आमच्यात तेवढी धमक आणि तेवढी ताकद आहे., अशी टीका अजित पवार यांनी केली होती. यावर सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलंय

मुंबई, ८ जानेवारी २०२४ : भारत देशात लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मन मोकळं करण्याचा अधिकार आहे. इट इज सो कुल म्हणत शरद पवार यांचं सुप्रिया सुळे यांनी कौतुक केलं. तर ८० पेक्षा जास्त वय असूनही शरद पवार जिद्दीने लढताय. त्यांचा हा आदर्श समोर ठेवला पाहिजे. शरद पवार यांचा एक उज्वल कार्यकाळ आहे. त्यांच्या करिअर ड्राफ्टवर बोलायला मी खूप लहान आहे, असेही म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिलं आहे. काही जण ऐकायलाच तयार नाही. ८० वय झालं तरी माणूस रिटायर्ड होईना…८४ वय झालं तर तुम्ही थांबना…असे काय चाललंय काय? असा सवाल अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांना विचारला. पुढे अजित पवार असेही म्हणाले की, आम्ही आहोत ना करायला, काही चुकलं तर सांगाना आम्हाला…आमच्यात तेवढी धमक आणि तेवढी ताकद आहे., अशी टीका अजित पवार यांनी केली होती.

Published on: Jan 08, 2024 06:09 PM