Supriya Sule : इतना तो हक बनता है… सुप्रिया सुळे यांनी कुणाला लगावला खोचक टोला
VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणातून मोदी यांनी अजित पवार यांच्या समोरच शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केलं असा सवाल मोदींनी केला होता. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
सिंधुदुर्ग, २७ ऑक्टोबर २०२३ | शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणातून मोदी यांनी अजित पवार यांच्या समोरच शरद पवार यांच्यावर टीकास्त्र डागलं. शरद पवार केंद्रात बराच काळ कृषी मंत्री राहिले पण शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा सवाल मोदींनी केला. याला सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलंय. ‘देशाला आणि जनतेला शरद पवार यांचं काम माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच मोदी सरकारकडून शरद पवार यांना कृषी क्षेत्रातील कामासाठी पद्मविभूषण पुरस्कार दिला होता. एका गोष्टीचा मला आनंद आहे की, महाराष्ट्रात मोदी आल्यानंतर त्यांनी शरद पवार यांचं नाव घेतलं. मोदी नेहमीच शरद पवार यांचं नाव घेतात कधी प्रेमाने तर कधी टीकेने…पण राजकारणात इतकं चालंत’, असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात. इतकंच नाही तर इतना तो हक बनता है..असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना खोचक टोलाही लगावला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल बोलताना पंतप्रधान नेहमी पक्षाचा उल्लेख भ्रष्टाचारी पक्ष असं करायचे. मात्र यावेळी मोदींनी कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केला नाही, असेही त्या म्हणाल्या.