सुप्रिया सुळे आदित्य ठाकरे यांच्या ‘त्या’ वक्तव्याबाबत म्हणाल्या…
VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून आदित्य ठाकरे यांच्या 'त्या' वक्तव्याचं समर्थन, नेमकं काय म्हणाल्या...
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अटकेला घाबरले होते. मातोश्रीवर येऊन ते रडत होते. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची विनंती करत होते, असं विधान उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली. त्यांच्या या दाव्यावरून राजकारणात एकच आरोप प्रत्यारोप सुरू आहे. खासदार संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांच्या या विधानाचं समर्थन केलं आहे. आदित्य ठाकरे सत्य तेच बोलले असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या त्या वक्तव्याचे समर्थन केल्याचे पाहायला मिळाले आहे. त्या म्हणाल्या, ‘मला जे आदित्य ठाकरे माहिती आहेत. ते आदित्य ठाकरे खोटं बोलणार नाहीत. त्यामुळे मातोश्रीवर काय झालं होतं. ते आदित्य ठाकरे खरंच सांगतील’, असेही त्यांनी म्हटले.