Supriya Sule : संभल के रहो, इस भाजप से…, सुप्रिया सुळे यांनी कुणाला दिला इशारा
राज्याची कायदा आणि सुव्यवस्था पूर्णतः ढासळली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी फसवणूक केली असून राज्यातील परिस्थिती अशी असताना ते दुसऱ्या राज्यात प्रचार करण्यात व्यस्त आहेत. असे म्हणत भाजप हा विश्वास ठेवण्यासारखा पक्ष नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
मुंबई, १ नोव्हेंबर २०२३ | राज्याची कायदा आणि सुव्यवस्था पूर्णतः ढासळली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी फसवणूक केली असून राज्यातील परिस्थिती अशी असताना ते दुसऱ्या राज्यात प्रचार करण्यात व्यस्त आहेत. असे म्हणत भाजप हा विश्वास ठेवण्यासारखा पक्ष नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांना फसवले तर मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबतही दगाबाजी केले असे म्हणत अजित पवार गटाने संभाळून राहिले पाहिजे असा सल्ला वजा इशाराही सुप्रिया सुळे यांनी दिला. एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर त्यांना विधान परिषदेतून घेऊ असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, शिंदे अपात्र होणार आहे हे त्यांना माहिती आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांना दगाफटका केला ना? यांना जर शिंदे अपात्र होणार हे माहिती होतं तर मग शिवसेना उद्धव ठाकरे यांचा पक्ष का फोडला? उद्धव ठाकरे यांच्याशी दगाफटका केला? असा सवाल करत आपल्या घटक पक्षाशी देखील दगाफटका केल्याचे सुप्रिय सुळे म्हणाल्या. तर अजित पवार गटाला विनंती करत म्हणाल्या, कधी तरी एका ताटात आपण जेवलोय. ते शिंदेंना धोका देत आहेत. त्यामुळे संभल के रहो, इस भाजप से, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.