‘शरद पवार यांना काहीही झालं तर…’, सुप्रिया सुळे पवारांच्या धमकी प्रकरणानंतर आक्रमक अन् दिला इशारा
VIDEO | 'राज्यात खालच्या पातळीवरचं राजकारण सुरू', सुप्रिया सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून त्या तातडीने पोलीस आयुक्तांना भेट दिली. ‘पवार साहेबांना काहीही झालं तर त्यासाठी गृहखातं जबाबदार असेल ‘ असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला. सुप्रिया सुळे यांनी आज मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘पवार साहेब हे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना काहीही झालं तर ती केवळ राज्याचेचे नव्हे तर देशाचं गृहखातंही जबाबदार असेल’ असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शकतेने चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच याप्रकरणी आपण केवळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीच नव्हे तर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनाही हे निवेदन करणार असल्याचे त्यांनी सांगितलं.