नवाब मलिक 'या' मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरणार, कोणाकडून मिळाला AB फॉर्म?

नवाब मलिक ‘या’ मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरणार, कोणाकडून मिळाला AB फॉर्म?

| Updated on: Oct 29, 2024 | 1:09 PM

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अखेर मुंबईतील शिवाजीनगर- मानखुर्द या विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीचा उमेदवार ठरला असल्याची माहिती मिळत आहे. शिवाजीनगर- मानखुर्द या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

येत्या 20 नोव्होंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार असून विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. यंदा महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार असून 22 ऑक्टोबरपासून उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. तर आज 29 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटी तारीख आहे. अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवाजीनगर- मानखुर्द या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून त्यांना एबी फॉर्म देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक यांना वेटिंगवर ठेवण्यात आलं होतं. याच दरम्यान, त्याचं तिकीट पक्षानं नाकारलं असल्याने ते अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम होते. तर त्यांच्या मुलीला महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अशातच आज विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवट दिवस असून या शेवटच्या दिवसापर्यंत मलिकांच्या उमदेवारीबाबत निश्चितता नव्हती. मात्र आता अजित पवारांनी नवाब मलिकांना उमेदवारी दिल्याची माहिती असून नवाब मलिकांकडे एबी फॉर्मदेखील पोहोचला असल्याचे सूत्रांकडून कळतेय.

Published on: Oct 29, 2024 01:09 PM