नवाब मलिक यांची 1 वर्ष 5 महिन्यांनी जेलमधून सुटका अन् रुग्णालयातून बाहेर येताच जंगी स्वागत

नवाब मलिक यांची 1 वर्ष 5 महिन्यांनी जेलमधून सुटका अन् रुग्णालयातून बाहेर येताच जंगी स्वागत

| Updated on: Aug 14, 2023 | 10:30 PM

VIDEO | आरोग्याच्या कारणांमुळे नवाब मलिक यांचा न्यायालयाकडून जामीन मंजूर आणि कुर्ल्यातील क्रिटी केअर रुग्णालयात आरोग्य तपासणी, कुर्ल्यातील क्रिटी केअर रूग्णालयाबाहेर येताच समर्थकांकडून जोरदार स्वागत

मुंबई, १४ ऑगस्ट २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने नुकताच 2 महिन्यांचा जामीन मंजूर केला. मनी लाँड्रिग प्रकरणात आरोग्याच्या कारणांमुळे हा जामीन मंजूर करून न्यायालयाने नवाब मलिक यांना दिलासा दिला आणि 1 वर्ष 5 महिन्यांनंतर अखेर जेलमधून सुटका झाली आहे. जामीन मंजूर झाल्यानंतर सर्व औपचारिकता पूर्ण करण्यात आल्या. त्यानुसार नवाब मलिक यांची कुर्ल्यातील क्रिटी केअर रुग्णालयात आरोग्य तपासणी करण्यात आली. या दरम्यान रुग्णालयााबाहेर नवाब मलिक येताच त्यांच्या समर्थकांकडून जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी समर्थकांसह शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे या उपस्थित होत्या. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर नवाब मलिक यांचं राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही गटांकडून कुर्ल्यात जंगी स्वागत करण्यात आलं. तर नवाब मलिक यांच्या समर्थनाथ “कोण आला रे आला कोण आला? राष्ट्रवादीचा वाघ आला”, अशा घोषणा त्यांच्या समर्थकांकडून देण्यात आल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Aug 14, 2023 10:26 PM