Supriya Sule Lok Sabha Disqualification : मुलीच्या निलंबनावर शरद पवार यांचं भाष्य, म्हणाले, असं निलंबित करणं म्हणजे…
दोन दिवसांत 92 खासदारांना निलंबित केल्यानंतर मंगळवारी आणखी काही खासदारांना निलंबित केले. यामध्ये महाराष्ट्रातील दोन अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळेंवरही निलंबनाची कारवाई झाली. यावर शरद पवार यांनी भाष्य केले.खासदारांना निलंबित करण्यात आलंय. यामध्ये संसदरत्न सन्मान मिळालेल्या सुप्रिया सुळे....
मुंबई, १९ डिसेंबर २०२३ : केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत काही खासदारांचं निलंबन करण्याचा प्रस्ताव मांडला. यामध्ये काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांच्यापासून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि सपाच्या डिंपल यादव यांचा समावेश होता. संसदेच्या सुरक्षेबाबत झालेल्या गदारोळामुळे खासदारांचे निलंबन अद्याप सुरूच आहे. दोन दिवसांत 92 खासदारांना निलंबित केल्यानंतर मंगळवारी आणखी काही खासदारांना निलंबित केले. यामध्ये महाराष्ट्रातील दोन अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळेंवरही निलंबनाची कारवाई झाली. संसदेवर घुसखोरीच्या प्रकरणावर चर्चा व्हावी, या मागणीसाठी विरोधकांनी सभागृहात आवाज उठवला होता. मात्र सरकारने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. यावर शरद पवार यांनी भाष्य केले. ‘संसदेत चर्चा करण्याऐवजी विरोधी पक्षाच्या खासदारांना निलंबित करण्यात आलंय. यामध्ये संसदरत्न सन्मान मिळालेल्या सुप्रिया सुळे यांनाही निलंबित केलं आहे. हे निलंबन करणं म्हणजे सत्तेचा गैरवापर आहे’