गॅरंटी गॅरंटी म्हणतात, पण मोदी गॅरंटी खरी नाही; शरद पवार यांनी उडवली खिल्ली
केंद्र सरकारच्या सर्व योजना फसव्या ठरल्या आहेत. सर्व योजना हवेत आहेत. या योजना प्रत्यक्षात आल्याच नाहीत, असं सांगतानाच मोदींची गॅरंटी वगैरे सांगितलं जात आहे. पण मोदी गॅरंटी काही खरी नाही, असा घणाघात मोदी सरकारवर केला. शिर्डीत दोन दिवसाचं राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यकर्ता शिबीराच्या समारोपाच्या भाषणातून जोरदार हल्लाबोल केला
शिर्डी, ४ जानेवारी २०२४ : शिर्डीत दोन दिवसाचं राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यकर्ता शिबीर होत आहे. आज या शिबीराचा समारोप आहे. यावेळी शरद पवार यांनी सांगता होत असलेल्या शिबीरातून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोदी गॅरंटीची खिल्ली उडवली आहे. केंद्र सरकारच्या सर्व योजना फसव्या ठरल्या आहेत. सर्व योजना हवेत आहेत. या योजना प्रत्यक्षात आल्याच नाहीत, असं सांगतानाच मोदींची गॅरंटी वगैरे सांगितलं जात आहे. पण मोदी गॅरंटी काही खरी नाही, असा घणाघात मोदी सरकारवर केला. पुढे ते असेही म्हणाले की, . सत्ता आल्यानंतर भाजपने अनेक कार्यक्रम हाती घेतले. प्रत्यक्षात अंमलबजावणी न करता लोकांची फसवणूक करण्याचं काम भाजपने केलं. ते लोकांच्या लक्षात आलं आहे. मोदी संसदेत क्वचितच येतात. मोदी एक दिवशी म्हणाले, 2022पर्यंत शहरी भागातील लोकांना पक्की घरं देऊ. पण ही घोषणा हवेतच राहिली. माझी गॅरंटी आहे, असं मोदी वारंवार सांगतात. पण ती गॅरंटी काही खरी नाही. याचा अनुभव हा अनेकवेळेला आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली.