Sharad Pawar UNCUT PC | केंद्र सरकारने कायदे करताना त्यावर चर्चा होण्याची गरज : शरद पवार

| Updated on: Dec 25, 2021 | 8:54 PM

आज देेशात आणि राज्यात शेतीला प्रधान्याने पहायला पाहिजे. Pdcc बँक शून्य टक्के व्याजाने शेतकऱ्यांना कर्ज देऊ शकते तर केंद सरकार आणि इतर ठिकाणी हे व्हायला पाहिजे. केंद्र सरकारच्या नियमांची अधिक पायमल्ली होऊ नये यासाठी आता थांबतो, असे शरद पवार म्हणाले.

पुणे : राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राजगुरुनगर येथे शेतकरी मेळावा संपन्न झाला. राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरु महाविद्यालयात शेतकरी मेळाव्याला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी संबोधित केले. केंद्र सरकारने तीन कायदे केले त्या कायद्यात काही गोष्टी व्यवस्थित होत्या तर काही अडचणी तयार करणाऱ्या होत्या. केंद्र सरकारने कायदे करताना कायद्याची चर्चा होण्याची गरज आहे. मात्र कायदे करताना त्यावर चर्चा करणार नसेल तर ही हुकूमशाही आहे. आज देेशात आणि राज्यात शेतीला प्रधान्याने पहायला पाहिजे. Pdcc बँक शून्य टक्के व्याजाने शेतकऱ्यांना कर्ज देऊ शकते तर केंद सरकार आणि इतर ठिकाणी हे व्हायला पाहिजे. केंद्र सरकारच्या नियमांची अधिक पायमल्ली होऊ नये यासाठी आता थांबतो, असे शरद पवार म्हणाले.