Sharad Pawar | सध्या साखर उद्योग अडचणीत आहे : शरद पवार
शरद पवार यांनी ग्रामीण भाग सहकारामुळं कसा बदलला याचं उदाहरण देऊन सांगितलं. पूर्वी परातीत चहा यायचा नंतर कप आले पण त्याचा कान तुटलेला होता, पण आज परिस्थिती बदलली आहे. हे चित्र बदलण्यास सहकार उद्योग कारणीभूत आहे, असं शरद पवार म्हणाले.
अहमदनगर : श्रीगोंदा येथील तत्त्वनिष्ठ व संयत नेतृत्व माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. शरद पवार यांनी यावेळी माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या आठवणी जागवल्या. अहमदनगरमधील पाण्याचा संघर्ष, सहकारानं शेतकऱ्यांच्या जीवनात घडवून आणलेला बदल, साखर कारखान्यांसमोरील आव्हानं यांसदर्भात भाष्य केलं. शरद पवार यांनी ग्रामीण भाग सहकारामुळं कसा बदलला याचं उदाहरण देऊन सांगितलं. पूर्वी परातीत चहा यायचा नंतर कप आले पण त्याचा कान तुटलेला होता, पण आज परिस्थिती बदलली आहे. हे चित्र बदलण्यास सहकार उद्योग कारणीभूत आहे, असं शरद पवार म्हणाले.
Latest Videos