Breaking : ढोकळा न फाफडो, वेदांता प्रोजेक्ट आपडो... पन्नास खोके, मजेत बोके; राष्ट्रवादीचा हल्लाबोल

Breaking : ढोकळा न फाफडो, वेदांता प्रोजेक्ट आपडो… पन्नास खोके, मजेत बोके; राष्ट्रवादीचा हल्लाबोल

| Updated on: Sep 15, 2022 | 1:34 PM

युवक काँग्रेसच्यावतीने मंत्रालयाजवळ आंदोलन करण्यात येणार होते. मात्र पोलिसांनी राष्ट्रवादी भवन येथेच युवकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्याने युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण आणि कार्यकर्त्यांनी शिंदे - फडणवीस यांच्याविरोधात जोरदार आंदोलन केले.

मुंबई: वेदांता प्रकल्प (vedanta project) गुजरातला गेल्याने राष्ट्रवादी (ncp)काँग्रेस आज प्रचंड आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यापाठोपाठ आज मुंबईतही (mumbai) जोरदार आंदोलन केलं. ढोकळा न फाफडो, वेदांता प्रोजेक्ट आपडो… पन्नास खोके मजेत बोके, महाराष्ट्राला धोके… शिंदे – फडणवीस तुपाशी, महाराष्ट्र उपाशी… गुजरातच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले महाराष्ट्रद्रोही नेते… स्वतःला 50 खोके, महाराष्ट्रातल्या युवकांना धोके… ईडी सरकार हाय हाय… अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी भवन परिसर दणाणून सोडला.

महाराष्ट्रात नियोजित असणारा वेदांता ग्रुप व फॉक्सकॉन कंपनीचा 1 लाख 54 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. महाराष्ट्रातील तरुणांच्या हक्काचा रोजगार परराज्यात नेणार्‍या शिंदे व फडणवीस सरकारच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी भवन येथे आंदोलन करण्यात आले.

युवक काँग्रेसच्यावतीने मंत्रालयाजवळ आंदोलन करण्यात येणार होते. मात्र पोलिसांनी राष्ट्रवादी भवन येथेच युवकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्याने युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण आणि कार्यकर्त्यांनी शिंदे – फडणवीस यांच्याविरोधात जोरदार आंदोलन केले. यावेळी युवकांनी फलक दाखवून आणि घोषणा देत परिसर दणाणून सोडला. त्यानंतर युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Published on: Sep 15, 2022 01:34 PM