Rohini Khadse : मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे ‘महाशक्ती’? रोहिणी खडसे ट्वीट करत म्हणाल्या, ‘बंधू राज साहेब….’
उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांच्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची मान्यता रद्द व्हावी, या मागणीसाठी सुनील शुक्ला यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. या वादात आता रोहिणी खडसेंनी उडी घेतली.
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पक्ष म्हणून मान्यता रद्द करण्यात यावी, यासाठी हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. यावरून संपूर्ण महाराष्ट्रात एकच वाद निर्माण झाला आहे. या वादात आता शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीने देखील उडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी यामागे कदाचित कोणती महाशक्ती तर नाही ना? अशी शंका व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्वीट देखील केले आहे. त्यात असे म्हटले की, ‘मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली जात आहे, पक्षाला विविध इशारा दिले जात आहेत, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना टार्गेट केले जात आहे.’, असं रोहिणी खडसे यांनी म्हटलंय तर बंधू राज साहेब, मराठी पक्षांचे, मराठी उद्योजकांचे, मराठी भाषेचे किंबहुना महाराष्ट्र आणि मराठी माणसांचे काही पक्षांना वावगं आहे. कारण याआधीही मराठी माणसांनी बनवलेले दोन मराठी पक्ष फोडण्यात आले आहेत. तुम्ही एकदा तपासून घ्यावे मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे कदाचित ‘महाशक्ती’ तर नाही? अशी शंका देखील त्यांनी उपस्थित केली आहे.

ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं दीर्घआजारपणाने निधन

ही चांडाळ चौकटी युती होऊच देणार नाही, राज-उद्धव युतीवर शिरसाटांची टीका

पवार काका-पुतण्याच्या एकत्र येण्यावर राऊतांची टीका

'...तर कायमचं शेतावर जावू, अशी शिंदेंना भिती', संजय राऊतांनी डिवचलं
