मराठा आरक्षणाऐवजी आता मिशन विधानसभा, शरद पवारांचा 'तो' सल्ला भुजबळ-जरांगेंनी फेटाळला अन्....

मराठा आरक्षणाऐवजी आता मिशन विधानसभा, शरद पवारांचा ‘तो’ सल्ला भुजबळ-जरांगेंनी फेटाळला अन्….

| Updated on: Aug 13, 2024 | 10:58 AM

ओबीसीतून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे. याच मागणीला छगन भुजबळ यांचा विरोध आहे. अशातच शरद पवार यांनी बैठक घेत मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळांनी समोरा समोर बसून चर्चा करून मार्ग काढण्याचा सल्ला दिलाय.

मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा शरद पवार यांनी मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांना एकत्रित आणण्याचा सल्ला दिला आहे. मात्र मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळांनी शरद पवार यांचा हा सल्ला फेटाळला आहे. चर्चेची गरज नाही असं दोघांनी म्हटलं आहे. त्यामुळे आरक्षणावरून विधानसभा निवडणुकीत पाडापाडीचं चित्र पाहायला मिळत आहे. शरद पवार जवाब दो… असं म्हणत मराठा क्रांती मोर्च्याचे रमेश केरे पाटील यांचा मोर्चा पुण्यातील शरद पवार यांच्या निवासस्थानी धडकला. मराठा आरक्षणावर भूमिका काय? असे म्हणत केरे पाटील यांनी शरद पवारांना एक निवेदन दिलं. केरे पाटील यांनी दिलेल्या निवेदनानंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात बॉल टाकला आणि जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांना एकत्र बसवून मार्ग काढण्याचा सल्ला दिला. तर सर्वपक्षीय बैठक बोलावली होती पण महाविकास आघाडीचे नेते त्यासा आलेच नसल्याचे म्हणत एकनाथ शिंदेंनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं.

Published on: Aug 13, 2024 10:58 AM