ईडीचं हत्यार, कोर्टात लढणार… रोहित पवार यांना ED चं समन्स, शरद पवार आक्रमक; काय म्हणाले बघा?
ठाकरे गटाच्या नेत्यानंतर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना देखील ईडीने समन्स.... केंद्र सरकार ईडीचा वापर एखाद्या हत्याराप्रमाणे करतंय त्याविरोधात कोर्टात लढणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटलंय. ईडी कारवायांवरून शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
मुंबई, २१ जानेवारी २०२४ : ठाकरे गटाच्या नेत्यानंतर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना देखील ईडीने समन्स बजावलं आहे. यानंतर शरद पवार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्र सरकार ईडीचा वापर एखाद्या हत्याराप्रमाणे करतंय त्याविरोधात कोर्टात लढणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटलंय. ईडी कारवायांवरून शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ईडीचा वापर विरोधकांच्या विरोधात शस्त्रांप्रमाणे होतोय आता कोर्टातच लढणार, अशी भूमिका सर्वच विरोधकांनी घेतल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. राज्यात गेल्या तीन-चार दिवसातील प्रकरणं पाहिली तर ठाकरे गटाचे नेते सूरज चव्हाण यांना ईडीने अटक केली. किशोरी पेडणेकर यांना ईडीचं समन्स आलं, राजन साळवी यांच्यावर एसीबीचे छापे पडले तर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनाही ईडीचे समन्स बजावले असून चौकशीसाठी बोलावले आहे. महाराष्ट्रातील या ताज्या कारवायांवर काय म्हणाले शरद पवार बघा स्पेशल रिपोर्ट…