NCP पक्ष कुणाचा अन् अध्यक्ष कोण? पक्ष आणि चिन्ह नेमकं कुणाचं यावर निवडणूक आयोगात कधी होणार सुनावणी?
VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीवर, पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह नेमकं कोणाचं? लवकरच होणार निवडणुकीत आयोगात सुनावणी? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खरे अध्यक्ष शरद पवार की अजित पवार?
नवी दिल्ली १४ सप्टेंबर २०२३ | अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बंड पुकारल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवर आणि पक्ष-चिन्ह कुणाचं या मुद्द्यावर लवकरच निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील दोन्ही गटांना ६ ऑक्टोबर रोजी सुनावणीसाठी बोलावले आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाने या सुनावणीसाठी दोन्ही गटांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना कागदपत्रे जमा करण्यासाठी मुदत दिली होती. ही मुदत संपली आहे. त्यामुळे आता दोन्ही गटांना सुनावणीसाठी नोदीस देण्यात आली आहे.