शरद पवार यांच्याशिवाय महाविकास आघाडी होणार? ठाकरे अन् पटोले यांच्यातील ‘मातोश्री’च्या चर्चेत नेमकं काय झालं?
VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीमुळे महाविकास आघाडीमध्ये संभ्रम, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचा प्लान बी तयार, बघा स्पेशल रिपोर्ट...
मुंबई, १५ ऑगस्ट २०२३ | शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील वाढत्या भेटीगाठींमुळे महाविकास आघाडीमध्ये संभ्रम निर्माण झालाय. तर २०२४ च्या निवडणुका शरद पवार यांच्याशिवाय लढवाव्या लागल्या तर ठाकरे आणि काँग्रेसचा प्लान बी तयार असल्याची माहिती आहे. तर मातोश्रीवर झालेल्या उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्यातील भेटीतील चर्चेत नेमकं काय झालं? शरद पवार यांच्याशिवाय २०२४ च्या निवडणुका शरद पवार यांच्याशिवाय लढवण्याबाबत ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. दोन दिवसांपूर्वी नाना पटोले हे मातोश्रीवर दाखल होत त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तब्बल अडीच तास ही बैठक चालली. याबैठकीत उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि संजय राऊत हजर होते. यावेळी राष्ट्रवादीशिवाय आगामी निवडणुका लढण्यासाठी आपण तयार असलं पाहिजे, पवार सोबत आले नाहीत तर आपला प्लान बी तयार असला पाहिजे, अशी चर्चा या मातोश्रीच्या बैठकीत झाल्याची माहिती समोर येतेय.