‘लाडकी बहीण’च्या श्रेयवादावरुन ठाकरे-पवारांनी महायुतीला घेरलं, ‘1500 नको, आधी बहिणींची…’
पंधराशे रुपयांपेक्षा बहिणींची अब्रू वाचवणे आणि संरक्षणाची गरज असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलं. तर फक्त शरद पवारच नव्हे शिर्डीतून उद्धव ठाकरेंनी देखील लाडकी बहीण योजनेवरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन महाविकास आघाडीनं पुन्हा एकदा महायुतीवर टीकास्त्र डागलं आहे. पंधराशे रुपयांपेक्षा बहिणींची अब्रू वाचवणं गरजेचं असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. तर महायुतीमधील श्रेयवादावरुन उद्धव ठाकरेंनी महायुतीला धारेवर धरलं आहे. लाडकी बहीण योजनेवरुन सुरु झालेलं राजकारण थांबण्याचं नाव घेत नाहीये. लाडकी बहीण योजनेवरुन शरद पवारांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. पंधराशे रुपयांपेक्षा बहिणींची अब्रू वाचवणं आणि संरक्षण देणं जास्त महत्त्वाचं असल्याचं म्हणत पवारांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेवरुन महायुतीत सुरु असलेल्या श्रेयवादावरुन देखील उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र डागल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंच्या टीकेचं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेवरुन महायुतीत सुरु असेलली श्रेयवादाची लढाई. कधी दादांच्या जाहिरातीत मुख्यमंत्र्यांचं नाव नाही. तर कधी भाजप-शिंदेंच्या कार्यकर्त्यांच्या बॅनरवर अजितदादांचा फोटो नाही. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट