Sharad Pawar : ‘हीच ती वेळ… एका पराभवाने खचणार नाही’, दिल्ली बैठकीत शरद पवारांचं मोठं वक्तव्य
विधानसभेतील मविआच्या दारूण पराभवानंतर पक्षाच्या बैठकीत शरद पवार यांनी यावर पुन्हा एकदा आपलं मतं व्यक्त केलं. नुकतीच दिल्ली येथे एक कार्यकारणीची बैठक झाली.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान विधानसभेतील मविआच्या झालेल्या दारूण पराभवानंतर पक्षाच्या बैठकीत शरद पवार यांनी यावर पुन्हा एकदा भाष्य केले आहे. विधानसभेला मविआचा पराभव झाला पण एका पराभवाने आम्ही खचणार नाही, दिल्ली येथे पक्षाच्या कार्यकारणी बैठकीत शरद पवार यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर खचलेल्या कार्यकर्त्यांना शरद पवारांनी नव्या उमेदीने लढण्याचा संदेश दिला आहे. राजकीय परिस्थिती पाहता खंबीर वैचारिक लढा देण्याची हीच ती वेळ आहे, अशा सूचना शरद पवारांनी कार्यकर्त्यांना केल्यात. दिल्लीच्या कार्यकारणी बैठकीत शऱद पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीत मविआचा पराभव झाला. पण एका पराभवाने खचून जाणारी आम्ही माणसं नाहीत. तर राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून तसेच कुणाल कामराच्या विरोधातील वाद उफाळून आला आहे. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर तसंच नागपुरातील हिंसाचाराच्या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा झाली.

वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते

कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट

मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी

'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
