किती वेळा शिव्या खाल्या बोल खाल्ले, मात्र सुधरायचं नाव नाही; राऊत यांच्यावर शिंदे गटाच्या नेत्याची सडकून टीका

किती वेळा शिव्या खाल्या बोल खाल्ले, मात्र सुधरायचं नाव नाही; राऊत यांच्यावर शिंदे गटाच्या नेत्याची सडकून टीका

| Updated on: May 04, 2023 | 2:50 PM

शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी राऊतांवर टीका करताना, हा प्रत्येक वेळेला इतर पक्षाच्या कामांमध्ये हस्तक्षेप करतो. त्यालामुळे अनेक वेळी नेत्यांच्या शिव्या आणि बोल खावे लागले आहेत.

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा दिला. तो राजीनामा त्यांनी फक्त अजित पवार आणि राष्ट्रवादीचा गट भाजपसोबत जाऊ नये यासाठी दिल्याचं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यावरून आता त्यांच्यावर टीका होत आहे. अशीच टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने केली आहे. शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी राऊतांवर टीका करताना, हा प्रत्येक वेळेला इतर पक्षाच्या कामांमध्ये हस्तक्षेप करतो. त्यालामुळे अनेक वेळी नेत्यांच्या शिव्या आणि बोल खावे लागले आहेत. मात्र याच्यात काही सुधारणा होत नाही. त्याला आपल्या पक्षात न बघता दुसऱ्याच्या पक्षात वाकून पाहण्याची सवय लागली आहे. त्याला तो रोग लागला आहे. तर सध्या जे राष्ट्रवादीत आणि शरद पवार यांच्याबरोबर सुरू आहे. ते न पाहता शहानपणा करायला कोणी सांगितलं असा सवाल केला आहे. तर आपापसामध्ये शंकेचे वातावरण तयार करण्याचं घाणेरडं काम राऊत करतो अशी टीका केली आहे.

Published on: May 04, 2023 02:50 PM