शरद पवार नास्तिक, शिवसेनेच्या 'या' नेत्यानं असं का म्हटलं?

शरद पवार नास्तिक, शिवसेनेच्या ‘या’ नेत्यानं असं का म्हटलं?

| Updated on: Apr 09, 2023 | 7:36 PM

VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावर केलेल्या टीकेवर शिवसेनेच्या नेत्याचं प्रत्युत्तर

अयोध्या : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्या दौऱ्यावर असताना विरोधकांनी शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर चांगलाच हल्लाबोल केला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली, ते म्हणाले राज्य संकटात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत जाऊन बसले. या टीकेवर शिवसेनेचे नेते विजय शिवतरे यांनी उत्तर दिले आहे. ‘शरद पवार असं बोलले त्यामागील हेतू असाच आहे की शरद पवार नास्तिक आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणींवर मुख्यमंत्र्यांचं लक्ष आहे. त्यामुळे योग्य ती मदत त्यांना मिळणार आहे. पण विरोधकांना विरोध करण्याचे काम आहे ते विरोध करणार’, असे विजय शिवतरे यांनी म्हटले आहे.

Published on: Apr 09, 2023 07:36 PM