बारसू रिफायनरीसंदर्भात शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, काय मांडली भूमिका?
VIDEO | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रत्नागिरीतील बारसू रिफायनरीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला फोन अन्...
मुंबई : रत्नागिरीतील बारसू रिफायनरी प्रकल्पासंदर्भात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केल्याचे समोर आले आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून त्यांनी बारसू रिफायनरी संदर्भात चर्चा केली आहे. रत्नागिरीतील बारसू रिफायनरीला बारसू स्थानिकांकडून मोठा विरोध होत असताना शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केलेला फोन हा चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, बारसू रिफायनरी संघर्ष समितीचे सदस्य हे सत्यजित चव्हाण यांच्यासह शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या फोनवरून संवाद झाला. तर यावेळी बारसू ऱिफायनरी विरोधात स्थानिकांची नेमकी कोणती भूमिका आहे, हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तर यापूर्वी देखील राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे आता शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या चर्चेतून कोणती भूमिका समोर येणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.