सातारा दौऱ्यावर असताना शरद पवार गहिवरले अन्… , बघा व्हिडीओ
VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सातारा दौऱ्यावर असताना झाले भावूक, पण काय होतं कारण पवार गहिवरले?
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज सातारा दौऱ्यावर असताना साताऱ्यात आयोजित कार्यक्रमात शरद पवार यांना गहिवरून आल्याचे पाहायला मिळाले. रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीची माहिती ऐकत असताना शरद पवार भावूक झाले. कार्यक्रमादरम्यान रयत शिक्षण संस्थेचं कामकाज त्यांनी केलेली कामं आणि शरद पवारांचे योगदान याबद्दल चेअरमन अनिल पाटील बोलत होते. हे ऐकत असताना शरद पवार भावूक झाले होते. या कार्यक्रमात शरद पवार म्हणाले, केंद्र सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. तर मनीष सिसोदिया यांच्यावर झालेली कारवाई अन्यायकारक असल्याचेही त्यांनी म्हटले.
Published on: Mar 05, 2023 07:59 PM
Latest Videos