शरद पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने सर्व कार्यक्रम रद्द, डॉक्टरांनी काय दिला सल्ला?

शरद पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने सर्व कार्यक्रम रद्द, डॉक्टरांनी काय दिला सल्ला?

| Updated on: May 06, 2024 | 5:57 PM

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार गटाची नुकतीच सांगता सभा झाली. शरद पवार हे सातत्याने प्रचारसभांमध्ये भाषण करत आहेत. वयाचं भान न ठेवता शरद पवार हे स्वत: प्रचारसभांमधून संबोधित करताना दिसताय. मात्र उन्हाचा आणि धावपळीचा फटका शरद पवार यांना बसलाय

राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रमुख नेते शरद पवार गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दौरे करून राजकीय प्रचार सभा घेत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार गटाची नुकतीच सांगता सभा झाली. शरद पवार हे सातत्याने प्रचारसभांमध्ये भाषण करत आहेत. वयाचं भान न ठेवता शरद पवार हे स्वत: प्रचारसभांमधून संबोधित करताना दिसताय. मात्र उन्हाचा आणि धावपळीचा फटका शरद पवार यांना बसला आहे. शरद पवार यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. मुळे शरद पवार यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शरद पवार यांचे कुटुंबिय श्रीनिवास पवार, रणजित पवार यांनी शरद पवार यांची मोदी बागेत जावून भेट घेतली आहे. बारामतीत उद्या मतदान आहे. शरद पवार कुटुंबियांकडून सदस्यांकडून यंत्रणेचा आढावा घेत आहेत. शरद पवार यांना डॉक्टरांनी दोन दिवस भाषण करु नका, असा सल्ला दिला आहे.

Published on: May 06, 2024 05:57 PM