अजित पवार गटातील ‘या’ २४ आमदारांवर होणार कारवाई, काय केली राष्ट्रवादी काँग्रेसनं मागणी?
VIDEO | अजित पवार गटातील २४ आमदारांवर शरद पवार गटाकडून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिस्तपालन समितीत या २४ आमदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्याचे निश्चिक करण्यात आले.
मुंबई, १२ ,सप्टेंबर २०२३ | राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर जे आमदार अजित पवार गटात गेले आहेत. त्या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी आता शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे. २ सप्टेंबर रोजी शरद पवार गटाच्या शिस्तपालन समितीची बैठक पार पडली त्या बैठकीत २४ आमदारांची नाव ही कारवाईसाठी निश्चित करण्यात आली आहे. हे २४ आमदार अजित पवार गटातील असून ज्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे. त्यांची यादी देखील तयार करण्यात आली आहे. संबंधित २४ आमदारांना ही यादी आणि पत्र पाठवण्यात आले आहे. या २४ आमदारांमध्ये विधानसभा आणि विधानपरिषदेच्या आमदारांचा समावेश समावेश असल्याचे सांगितले जात आहे. अजित पवार गटातील या सर्व २४ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे.
Published on: Sep 12, 2023 10:53 AM
Latest Videos