'पैसे पाठवा अन्यथा, सलमान खानसारखं प्रकरण करू', शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी

‘पैसे पाठवा अन्यथा, सलमान खानसारखं प्रकरण करू’, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी

| Updated on: Apr 22, 2024 | 4:00 PM

जितेंद्र आव्हाड यांना बिष्णोई गँगच्या नावानं फोन आलाय. जितेंद्र आव्हाड यांना रोहित गोदारा नामक व्यक्तीचा फोन आल्याची माहिती मिळतेय. 'पैसे पाठवा अन्यथा, सलमान खानसारखं प्रकरण करू', अशी मागणी करत या फोनवरून जितेंद्र आव्हाड यांना धमकी देण्यात आली.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांच्या घरावर आताच गोळीबार घडल्याची घटना घडली. यानंतर मुंबई पोलिसांनी तपास करत या प्रकरणामागील सूत्रधार शोधण्याचा प्रयत्न सुरू केलाय. दरम्यान, या गोळीबार घटनेची जबाबदारी सोशल मीडियाच्या माध्यमातून बिष्णोई गँगने घेतली. यानंतर आता बिष्णोई गँगने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकी दिल्याचे समोर आले आहे. इतकंच नाही तर लाखोंची खंडणी मागितल्याचेही कळतंय. जितेंद्र आव्हाड यांना बिष्णोई गँगच्या नावानं फोन आलाय. जितेंद्र आव्हाड यांना रोहित गोदारा नामक व्यक्तीचा फोन आल्याची माहिती मिळतेय. ‘पैसे पाठवा अन्यथा, सलमान खानसारखं प्रकरण करू’, अशी मागणी करत या फोनवरून जितेंद्र आव्हाड यांना धमकी देण्यात आली.  पैसे न दिल्यास अन्यथा सलमान खान सारखे होणार असल्याचे म्हटले आहे. त्याने आपले नाव रोहित गोदारा म्हटले आहे. हा फोन ऑस्ट्रेलियातून आला आहे.

Published on: Apr 22, 2024 04:00 PM