सुप्रिया सुळे यांच्यामुळे लोकं पक्ष सोडताय, तरुण तडफदार महिला नेत्याचे गंभीर आरोप
नेत्यांना पक्षातून हटवण्याचं काम सुरू आहे तर सुप्रिया सुळे यांच्या बाजूचे लोक कारस्थान रचत आहेत, असा गंभीर आरोप सोनिया दुहान यांनी केला. पुढे त्या असंही म्हणाल्या, 'मी आजपर्यंत पक्ष सोडला नाही. पण मी खूप लवकरच पक्ष सोडण्याचा निर्णय घेणार आहे. मी दुसरा कोणत्या पक्षात प्रवेश करणार नाही. तुम्हाला वाटेल की...'
शरदचंद्र पवार पक्षाच्या तरुण तडफदार महिला नेत्या सोनिया दुहान यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुप्रिया सुळे आमच्या नेत्या बनू शकल्या नाहीत. सुप्रिया सुळे आमच्या नेत्या बनू शकल्या नाहीत. त्यांच्यामुळे आणि त्यांच्या आजूबाजूच्या काही लोकांमुळे आमच्यासारखे जे एकनिष्ठ लोक आहेत, जे शरद पवार यांच्यासाठी काहीही करायला तयार आहेत, ते लोक निर्णय घेत आहेत आणि पक्षाला सोडून जात आहेत, असं वक्तव्य सोनिया दुहान यांनी केलं. नेत्यांना पक्षातून हटवण्याचं काम सुरू आहे तर सुप्रिया सुळे यांच्या बाजूचे लोक कारस्थान रचत आहेत, असा गंभीर आरोपही सोनिया दुहान यांनी केला. पुढे त्या असंही म्हणाल्या, ‘मी आजपर्यंत पक्ष सोडला नाही. पण मी खूप लवकरच पक्ष सोडण्याचा निर्णय घेणार आहे. मी दुसरा कोणत्या पक्षात प्रवेश करणार नाही. तुम्हाला वाटेल की, मी उद्या अजित पवार गट, भाजप किंवा काँग्रेस पक्षात जाईन, तर तसं नाही. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी सध्या कोणताच निर्णय घेणार नाही. सुप्रिया सुळेंच्या आजूबाजूला काही लोक असे आहेत जे पक्षाचं काम करणाऱ्या नेत्यांना संपवण्याचे आणि हटवण्याचे आणि मजबूर करण्याचं काम करत आहेत. पक्ष सोडावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत’, असा गंभीर आरोप करत त्यांनी सुळेंवर हल्ला चढवला.