विद्या चव्हाण यांचा चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप, केली पोलखोल अन् ऐकवली ‘ती’ ऑडिओ क्लिप
Vidya Chavan on Chitra Wagh : विद्या चव्हाण यांच्या घरगुती वादात चित्रा वाघ या हस्तक्षेप करत असून त्यांच्या घरात असलेल्या वादाचा फायदा चित्रा वाघ यांनी घेत असून षढयंत्र रचल्याचा गंभीर आरोप विद्या चव्हाण यांनी केला आहे. इतकंच नाहीतर विद्या चव्हाण यांनी भर पत्रकार परिषदेच चित्रा वाघ यांची एक ऑडिओ क्लिप ऐकवली अन् चर्चांना उधाण आले.
शरद पवार गटाच्या महिला नेत्या विद्या चव्हाण यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केल्याचे पाहायला मिळाले. चित्रा वाघ या विद्या चव्हाण यांच्या घरगुती वादात हस्तक्षेप करत असून त्यांच्या घरात असलेल्या वादाचा फायदा चित्रा वाघ घेत असून त्यांनी षढयंत्र रचल्याचा गंभीर आरोप विद्या चव्हाण यांनी केला आहे. इतकंच नाहीतर विद्या चव्हाण यांनी भर पत्रकार परिषदेच चित्रा वाघ यांची एक ऑडिओ क्लिप ऐकवली अन् चर्चांना उधाण आले. पत्रकार परिषदेच विद्या चव्हाण यांनी त्यांची सून आणि चित्रा वाघ यांच्यातील संभाषणाच्या एक कथित ऑडिओ क्लिपही ऐकवली. यावेळीच त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केल्याचे पाहायला मिळाले. ‘माझ्या घरातील लोकं राजकारणात नसताना, त्यांना खोटं बोलायला लावणं, सूनेला वकिलांचं पॅनेल देणं, तिला अडीच-तीन लाखांची नोकरी देणं, पार्ल्यात घर मिळवून देणं आणि मला छळायचं, असं सुरु आहे’, असा गंभीर आरोप विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांच्यावर केला आहे.