‘टप्प्यात येण्याआधी बोलायचं नसतं’, जयंत पाटील मिश्किलपणे नेमकं काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नावर सविस्तर भूमिका मांडली. ‘टीव्ही 9 मराठीच्या कॉन्क्लेव्ह’मध्ये ते बोलत होते.
टप्प्यात आलं की करेक्ट कार्यक्रम अशी जयंत पाटील यांची महाराष्ट्रात ओळख आहे. थोडक्यात भाजपचे समरजीत घाटगे यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश झाला, हर्षवर्धन पाटील प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत? म्हणजेच कोण कोणत्या टप्प्यात येणार? विधानसभेच्या आधी किती टप्पे असतील? असा मिश्किल सवाल जयंत पाटील यांना केला असता, ते म्हणाले, वाक्य काय आहे. टप्प्यात आला की करेक्ट कार्यक्रम. टप्प्यात यायच्या आधी बोलायचं नसतं. मग टप्प्यात येणार कसे लोकं. पुढे ते असेही म्हणाले, माझ्यावर पवारसाहेबांनी जबाबदारी दिली आहे. पक्ष वाढवण्याची. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची मनं राखून पक्ष वाढवण्याचं काम करत आहोत. सर्व होते तेव्हा ४ खासदार होते. सर्व गेले ८ खासदार झाले. स्वच्छ पक्ष म्हणून आमच्या पक्षाकडे पाहत आहेत. पवारांबाबत जनतेला विश्वास आहे. हा माणूस राज्याच्या हिताचं काम करू शकतो. राज्याच्या हितासाठी हा माणूस काम केलं आहे. आमच्यापेक्षा वेगाने पवार काम करतात. त्यामुळे आम्ही मोठ्या ताकदीने पुढे येऊ, असेही त्यांनी सांगितले.