शिवरायांचा जयजयकार केला अन् जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला, नेमकं काय घडलं?
संभाजीराजे छत्रपतींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयजयकार करत काही लोकांच्या जमावाने जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हा हल्ला केला आहे. तीन कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केल्याचे पाहायला मिळाले.
शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर काही कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे छत्रपतींबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. संभाजीराजे छत्रपतींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयजयकार करत काही लोकांच्या जमावाने जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हा हल्ला केला आहे. विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणच्या विरोधात संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. संभाजीराजे छत्रपती यांच्या संघटनेकडून विशाळगाडवर आंदोलनही करण्यात आलं होतं. या आंदोलनानंतर जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजेंवर टीका केली होती. ही टीका संभाजीराजे छत्रपती यांच्या जिव्हारी लागली होती. संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेकडून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात संताप व्यक्त करण्यात आला होता. तीन कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केल्याचे पाहायला मिळाले.