ज्यांनी पोरासारखं वागवलं तिचं कुंकू तुम्ही पुसायला निघाला, जितेंद्र आव्हाड कुणावर भडकले?

ज्यांनी पोरासारखं वागवलं तिचं कुंकू तुम्ही पुसायला निघाला, जितेंद्र आव्हाड कुणावर भडकले?

| Updated on: Feb 04, 2024 | 5:37 PM

कोणी सांगेल शेवटची निवडणूक आहे, आमकच आहे, तमकच आहे, पण ती शेवटची निवडणूक कधी होणार ते मला माहिती नाही. पण सतत असं सांगितलं जातं. तुम्ही भावनिक होऊ नका, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. अजित पवार यांनी केलेल्या या वक्तव्याचा उल्लेख करत आव्हाडांनी घेतला खरपूस समाचार

मुंबई, ४ फेब्रुवारी २०२४ : शेवटची निवडणूक सांगून मते मागतील, पण तुम्ही भावनिक होऊ नका, असं आवाहन करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. कोणी सांगेल शेवटची निवडणूक आहे, आमकच आहे, तमकच आहे, पण ती शेवटची निवडणूक कधी होणार ते मला माहिती नाही. पण सतत असं सांगितलं जातं. तुम्ही भावनिक होऊ नका, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. अजित पवार यांनी केलेल्या या वक्तव्याचा उल्लेख करत शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेत अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. तुम्ही जर शरद पवार कधी मरताय याची वाट पाहत असाल तर तुमच्या सारखं कृतघ्न कुणी नाही. शरद पवार कधी मरताय, त्यांची ही शेवटची निवडणूक असेल का? शरद पवार तुम्हाला भावनिक करतील…अरे काय बोलताय? असा सवाल करत जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता अजित पवार यांच्यावर हल्लाबोल चढवला.

Published on: Feb 04, 2024 05:37 PM