संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? शरद पवार गटाच्या आमदारानं थेट नावच घेतलं अन्..
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनावणे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सिद्धार्थ सोनावणे यानेच सरपंच संतोष देशमुख यांची टीप दिली होती, असा आरोप त्याच्यावर आहे.
गेल्या काही दिवसांपासून बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपी फरार होते. आता या तिन्हीही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनावणे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सिद्धार्थ सोनावणे यानेच सरपंच संतोष देशमुख यांची टीप दिली होती, असा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणातील एक एक खुलासे समोर येत असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी हत्याकांडाचा खरा मास्टमाईंड कोण यांचं नावच घेतल्याच पाहायला मिळत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड यांना जे सरंक्षण मिळत आहे ते धनंजय मुंडे मंत्री असल्याने मिळत आहे असा आरोप संदीप क्षीरसागर केला आहे. तर संतोष देशमुख यांची हत्या खंडणीमुळेच झाली आहे. या प्रकरणाचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तर या प्रकणाचं डायरेक्ट कनेन्शन दिसत आहे. पण अजूनही वाल्मिक कराडचे नाव कुठे दिसून येत नाही, असा आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला. तर मुख्य आरोपींच्या अटकेनंतर सर्व कारवाईला उशिर का होतोय? असा सवालही त्यांनी केला.