Rohini Khadse : ‘4 महिन्यापूर्वी जिंकलेला एक आमदार…’, साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं
'4 महिन्यापूर्वी 50 हजार मताधिक्याने जिंकलेला भाजप पार्टीचा एक आमदार, बॅलेट पेपरवर घेतलेल्या 'सहयाद्री कारखाना' निवडणूकीमध्ये विजयी उमेदवाराच्या अर्धी मते पण घेऊ शकला नाही. पैशाचा वारेमाप वाटप करुन देखील.....', असं ट्वीट रोहिणी खडसे यांनी केलंय.
सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीवरून पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचा भारतीय जनता पक्षाला टोला लगावला आहे. पैशाचा वारेमाप वाटप करूनही पराभव झाला असे म्हणत रोहिणी खडसे यांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या… विजयी उमेदवाराच्या अर्धी मतंही नाहीत, असं रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे. साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं आहे. कराडच्या सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीत माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलचा दणदणीत विजयी झाला. 21 पैकी 21 जागा जिंकत विरोधी भाजपाच्या दोन्ही पॅनेलचा पराभव माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलकडून करण्यात आला आहे. 7 हजार 500 ते 8 हजार मतांच्या फरकाने सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. तर भाजपा आमदार मनोज घोरपडे भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या पॅनेलचा या निवडणुकीत दारूण पराभव झाला आहे.