BIG BREAKING : राज्याच्या राजकारणात नवी घडामोड? शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार?

BIG BREAKING : राज्याच्या राजकारणात नवी घडामोड? शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार?

| Updated on: Feb 14, 2024 | 1:16 PM

अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तर यानंतर आता राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची माहित आहे.

पुणे, १४ फेब्रुवारी २०२४ : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपचा झेंडा हाती घेतला. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तर यानंतर आता राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची माहित आहे. दरम्यान, आगामी लोकसभा, राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी त्यांच्या पक्षातील सर्व आमदार आणि खासदार यांची बैठकही बोलावली आहे. शरद पवार गट काँग्रेस पक्षात विलीन होणार असल्याची बातमी समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार गटाकडून मात्र या बातमीला दुजोरा देण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते मंगलदास बांदल यांनी यावर भाष्य केल्याचे पाहायला मिळाले. पक्षाला विलीन करण्याचा निर्णय हा राष्ट्रीय पातळीवरचा आहे. वरिष्ठ नेते याबाबतचा निर्णय घेतील, असे त्यांनी म्हटले.

Published on: Feb 14, 2024 01:16 PM