'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल, बघा व्हिडीओ

‘ही त्यांची स्टाईल…’, शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल, बघा व्हिडीओ

| Updated on: May 02, 2024 | 2:29 PM

कोल्हापुरात आल्यावर मोदी म्हणतात नमस्कार कोल्हापूरकर... स्थानिक नेते लिहून देतात तशी भाषा नरेंद्र मोदी वापरतात आणि ते आपल्या भाषणाची सुरूवात करतात. मात्र मोदींनी साताऱ्यात यशवंतराव चव्हाण यांचं नाव घेतलं नाही, अशी टीकाही शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली

कोल्हापूर मतदारसंघातील लोकसभा उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर प्रचार सभा घेतली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या या सभेवरून शरद पवार यांनी त्यांची नक्कल केली आहे. कोल्हापुरात आल्यावर मोदी म्हणतात नमस्कार कोल्हापूरकर… स्थानिक नेते लिहून देतात तशी भाषा नरेंद्र मोदी वापरतात आणि ते आपल्या भाषणाची सुरूवात करतात. मात्र मोदींनी साताऱ्यात यशवंतराव चव्हाण यांचं नाव घेतलं नाही, अशी टीकाही शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. दरम्यान, ‘करवीर निवासीनी आई महालक्ष्मीच्या, आई अंबाबाईच्या चरणी त्रिवार वंदन करतो. तमाम कोल्हापुरकरांना माझा नमस्कार…’, असं म्हणत मोदींनी कोल्हापुरात आपल्या दमदार भाषणाची मराठीतून सुरूवात केल्याचे पाहायला मिळाले होते. यावरून शरद पवारांनी त्यांनी डिवचलं आहे.

Published on: May 02, 2024 02:29 PM