जातीच राजकारण करत आमचं खच्चीकरण केलं; भुजबळांवर नाशिकमधूनच हल्ला

| Updated on: Mar 16, 2023 | 1:50 PM

छगन भुजबळ यांच्यावर टीका करत आरोप केले आहेत. भुजबळांनी जातीच राजकारण करत आमचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला असा आरोप अमृता पवार यांनी केला आहे.

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांना नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. शरद पवार यांचे निकटवर्ती कैलासवासी वसंतराव पवार यांची कन्या अमृता पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका करत आरोप केले आहेत. भुजबळांनी जातीच राजकारण करत आमचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला असा आरोप अमृता पवार यांनी केला आहे. तर याबाबत आपण पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली होती. मात्र त्यांनी फक्त ऐकण्याचीच भूमिका पार पाडली. तर याची माहिती सुप्रिया सुळे यांना असताना देखिल त्याही काहीच करू शकल्या नाहीत अशी खंत अमृता पवार यांनी व्यक्त केली. तर राष्ट्रवादीत असताना देखिल भाजपचं काम केला या आरोपाला उत्तर देताना त्यांनी, राष्ट्रवादीने भारती पवार यांच्यावर अन्याय केला. त्यामुळे आम्ही त्यांचे काम केलं आणि त्या निवडणून गेल्या. आम्ही त्यांचे काम केलं भाजपच नाही. तर जिल्ह्यात काम करताना, भुजबळांना आणि त्यांच्या लोकांकडून हा जिल्हा दिल्यासारखं आहे. त्यामुळे त्यांच्या लोकांकडून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्रास देण्यात आला.

Published on: Mar 16, 2023 01:50 PM
एमआयएम विरोधात मनसेचं आंदोलन, पोलिसांनी मोर्चा रोखला; पाहा…
राज्यभरातील कर्मचारी संपाचा आज तिसरा दिवस; पुणे महापालिकेतील परिस्थिती काय? पाहा…