Sharad Pawar Candidate List : शरद पवारांची चौथी यादी जाहीर, ‘या’ 7 नेत्यांच्या नावाची घोषणा

Sharad Pawar Candidate List : शरद पवारांची चौथी यादी जाहीर, ‘या’ 7 नेत्यांच्या नावाची घोषणा

| Updated on: Oct 28, 2024 | 5:14 PM

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 7 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत कोणत्या उमेदवारांनी मिळाली संधी बघा व्हिडीओ

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आज चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. शरद पवार गटाकडून या चौथ्या यादीद्वारे आणखी ७ नव्या उमेदवारांची घोषणा पक्षाकडून करण्यात आली आहे. गेल्या 24 ऑक्टोबर रोजी शरद पवार गटाकडून 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. त्यांनतर 26 तारखेला 22 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी 27 ऑक्टोबरला 9 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली होती. यानंतर आज आणखी 7 उमेदवारांच्या नावाची चौथी यादी पक्षाकडून जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आतापर्यंत जाहीर करण्यात आलेल्य याद्यांनुसार एकूण 101 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. काटोलमधून सलील देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर माण विधानसभा मतदारसंघातून प्रभाकर घार्गे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच खानापूर येथून वैभव पाटील, वाई मतदारसंघातून अरुणादेवी पिसाळ यांना तिकीट जाहीर करण्यात आले आहे. दौंडमधून रमेश थोरात, पुसदमधून शरद मेंद, सिंदखेडा येथून संदीप बेडसे यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर करत विधानसभेच्या रिंगणात उतरवलं आहे.

Published on: Oct 28, 2024 05:14 PM