राज्य ठाकरे यांच्या रत्नागिरीतील टीकेला अजित पवार याचं उत्तर; म्हणाले, आता मिमिक्री करण्याशिवाय
त्यांनी रत्नागिरीच्या सभेत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जे अजित पवार यांच्याकडून घडलं त्यावरून टीका केली तसेच. अजित पवारांच्या तशा वागण्यानेच पवार यांनी राजीनामा मागा घेतला.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा दिला तो मागे ही घेतला. पण त्यावर राज्यात जे झालं त्यावरून अनेकांनी आप आपल्यापद्धतीने कारणांचा अंदाज लावू पाहतोय. अनेक नेत्यांनी यावर भाष्य केलं. त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील शरद पवारांच्या राजीनामा नाट्यावर भाष्य केलं. तसेच त्यांनी रत्नागिरीच्या सभेत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जे अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून घडलं त्यावरून टीका केली तसेच. अजित पवारांच्या तशा वागण्यानेच पवार यांनी राजीनामा मागा घेतला. अजित पवार त्या दिवशी प्रत्येकाला बोटांच्या सहाय्याने हाक मारली जात होती. गप्प करत होते. ‘अरे तू गप्प बस’, ‘अरे थांब.’ शरद पवारांच्या लगेच लक्षात आले की उद्या अजित पवारही त्यांना म्हणू शकतात- अरे गप्प बस. यावरूनच अजित पवार यांनी राज ठाकरे यांनी प्रत्यत्तर दिलं आहे. त्यांनी राज ठाकरे यांना, नौटंकी करण्याशिवाय काहीच येत नाही. तर मिमिक्री करण्याशिवाय दुसरं काय जमतं नाही. तसेच त्यांना जनतेने नाकारलेला आहे त्यांना त्यांचा पक्ष वाढवणे ऐवजी अजित पवारवर मिमिक्री करणे आणि अजित पवारचे व्यंगचित्र काढणं यातच समाधान वाटतंय असा टोला राज ठाकरे यांना लगावला आहे. त्यावरच हा स्पेशल रिपोर्ट