भ्रष्टाचारांचे सरदार टीकेला ‘तडीपार’नं प्रत्युत्तर, अमित शहा vs शरद पवारांमध्ये वार-पलटवार
पुण्यातून 21 जुलैला अमित शाह यांनी शरद पवार यांना भ्रष्टाचाराचं सरदार म्हटलं. त्या टीकेला शरद पवारांनी पाच दिवसांनंतर छत्रपती संभाजी नगरातून उत्तर दिलं. सुप्रीम कोर्टाने तडीपार केलेला माणूस देशाचा गृहमंत्री आहे, असा जळजळीत पलटवार शरद पवार यांनी केला. यानंतर भाजप आक्रमक झालाय.
अमित शाह यांनी शरद पवार यांना भ्रष्टाचाराचे सरदार म्हटल्यानंतर आता शरद पवार यांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिलंय. कोर्टानं तडीपार केलेला माणूस देशाचा गृहमंत्री आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं. तर अमित शाह यांना तडीपार म्हटल्यानंतर आता भाजपचे नेते आणखी आक्रमक झालेत. पुण्यातून 21 जुलैला अमित शाह यांनी शरद पवार यांना भ्रष्टाचाराचं सरदार म्हटलं. त्या टीकेला शरद पवारांनी पाच दिवसांनंतर छत्रपती संभाजी नगरातून उत्तर दिलं. सुप्रीम कोर्टाने तडीपार केलेला माणूस देशाचा गृहमंत्री आहे, असा जळजळीत पलटवार शरद पवार यांनी केला. या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय. शरद पवारांची अमित शाह यांच्यावर टीका म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे. असं बावनकुळे यांनी म्हटल्यानंतर पुन्हा शरद पवारांनी उत्तर देत, तोच दिवा महाराष्ट्राच्या जेलमध्ये पाहिल्याचं म्हटलं.