महाराष्ट्राचं राजकीय चित्र वेगानं बदलणार? राजीनामा मागे घेतल्यानंतर शरद पवार यांचा मोठा निर्धार
VIDEO | राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा निर्णय मागे घेतल्यानंतर शरद पवार पुन्हा सक्रीय, सोलापूर दौऱ्यावर असताना 'हा' मोठा निर्धार केला व्यक्त
सोलापूर : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या आग्रहानंतर तो शरद पवार यांनी मागेही घेतला. यानंतर शरद पवार पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार यांनी सोलापुरातून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कामाची सुरुवात तर करणारच होतो. माझी कामाची अनेक वर्षाची एक पद्धत आहे. कामाची सुरुवात करण्यासाठी मी दोन पैकी एका ठिकाणाची निवड करतो. एक तर सोलापूर किंवा कोल्हापूर. सोलापूरपासून दौऱ्यावर जावं हा विचार होता. त्यामुळे मी आलो. सामान्य कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारं हे शहर आहे. त्यामुळे मी इथे आलो. मला याचं समाधान आहे, असं सांगतानाच या ठिकाणी कार्यकर्त्यांना भेटावं त्यांचा उत्साह वाढवावा. पुनश्च हरिओम करावं. वेगाने महाराष्ट्राचं चित्रं कसं बदलता येईल याची काळजी घेणं हे मी ठरवलंय, असं पवार म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले की, बदल घडवून आणायचा असेल तर आम्हाला लक्ष घालावं लागेल. काम करावे लागेल. लोकांच्या सुखदु:खाशी समरस व्हावं लागेल. ते आम्ही करू. काम करावं लागेल. त्याशिवाय चित्र बदलणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.