Sharad Pawar : मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं थेट उत्तर अन् शाहंबद्दलही मोठा गौप्यस्फोट
बीड आणि परभणीमध्ये झालेल्या घटनांवरून महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आज भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘यशवंतराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण हे देशाचं गृहमंत्री होते. या पदाची गरीमा आणि प्रतिष्ठा या देशभक्तांनी ठेवली. बाबूभाई म्हणून गुजरातचे कर्तबगार प्रामाणिक […]
बीड आणि परभणीमध्ये झालेल्या घटनांवरून महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आज भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘यशवंतराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण हे देशाचं गृहमंत्री होते. या पदाची गरीमा आणि प्रतिष्ठा या देशभक्तांनी ठेवली. बाबूभाई म्हणून गुजरातचे कर्तबगार प्रामाणिक आणि स्वच्छ मुख्यमंत्री होते. त्यानंतर माधवराव सोलंकी आणि चिमणभाई पटेल आदी उत्तम प्रशासक होते. ही नावं सांगितली यांचं वैशिष्ट्ये म्हणजे त्यापैकी कुणालाही त्यांच्या राज्यातून तडीपार करण्यात आलं नाही,’, असं शरद पवार म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले, या देशाच्या स्वातंत्र्यानंतर काही कर्तृत्वान व्यक्ती, स्वातंत्र्यानंतर अत्यंत प्रभावी आणि सर्व देशाचं राज्यांना एकत्रित करण्याचं काम सरदार पटेल यांनी केलं. स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशात पंडित गोविंद वल्लभ पंत यांनी देशाचं गृहमंत्री म्हणून सर्वांनी अनुभवलं. महाराष्ट्राचं योगदान होतं. यशवंतराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण हे देशाचं गृहमंत्री होते. या पदाची गरीमा आणि प्रतिष्ठा या देशभक्तांनी ठेवली. आपलं शेजारचं गुजरात हे महाराष्ट्र हे एक राज्य होतं. गुजरातनेही अत्यंत उत्तम प्रकारची ओळख देशाला करून दिली असल्याचे शरद पवारांनी म्हटलं. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय.