कार्यकर्त्यांना दम दिल्यास... अजितदादांच्या आमदाराला शरद पवार यांचा इशारा, नेमकं काय घडलं?

कार्यकर्त्यांना दम दिल्यास… अजितदादांच्या आमदाराला शरद पवार यांचा इशारा, नेमकं काय घडलं?

| Updated on: Mar 08, 2024 | 11:58 AM

कार्यकर्त्यांना दमदाटी केली तर बघ, मला शरद पवार म्हणतात...अशा शब्दांत शरद पवार यांनी सुनील शेळके यांना ठणकावलं. मेळाव्याला येऊ नये, म्हणून कार्यकर्त्यांना ही दमदाटी केली आणि कार्यकर्त्यांना दमदाटी केल्यावरून शरद पवारांनी सुनावलं

मुंबई, ८ मार्च २०२४ : लोणावळ्यातून अजित पवार यांचे आमदार सुनील शेळके यांना शरद पवार यांनी थेट इशाराच दिला. कार्यकर्त्यांना दमदाटी केली तर बघ, मला शरद पवार म्हणतात…अशा शब्दांत शरद पवार यांनी सुनील शेळके यांना ठणकावलं. मेळाव्याला येऊ नये, म्हणून कार्यकर्त्यांना ही दमदाटी केली आणि कार्यकर्त्यांना दमदाटी केल्यावरून शरद पवारांनी सुनील शेळके यांना इशारा देत चांगलंच सुनावलं आहे. तर “मला असं समजलं की, तुम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथं येतायत म्हणून धमकी दिली. मी त्यांना सांगू इच्छितो. सुनील शेळके तू आमदार कोणामुळं झाला? तुझ्या सभेला कोण आलं होतं?” असा सवाल करत शरद पवार यांनी शेळकेंना सुनावलं. दरम्यान, शरद पवार यांनी पुरावे द्यावेत. अन्यथा सर्व आरोप खोटे केल्याचे राज्यभर सांगणार असल्याचाही इशारा आमदार सुनील शेळके यांनी शरद पवार यांना दिला. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Mar 08, 2024 11:58 AM