विधानसभेसाठी शरद पवारांची चाचपणी, ‘या’ 20 मतदारसंघाच्या जागा हेरल्या, तरुण उमेदवार मैदानात
शरद पवार यांच्याकडून तयारी सुरू झाली आहे. विधानसभेला २० मतदारसंघात शरद पवार हे तरूण-युवकांना संधी देणार आहे. इतकंच नाहीतर शरद पवार हे पक्ष सोडून गेलेल्या आमदारांविरोधात युवा नेते मैदानात उतरवणार असल्याची माहिती समोर येत आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेलाही शरद पवार यांची राष्ट्रवादी विरुद्ध अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदेंची शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे. अशातच शरद पवार यांच्याकडून तयारी सुरू झाली आहे. विधानसभेला २० मतदारसंघात शरद पवार हे तरूण-युवकांना संधी देणार आहे. इतकंच नाहीतर शरद पवार हे पक्ष सोडून गेलेल्या आमदारांविरोधात युवा नेते मैदानात उतरवणार असल्याची माहिती समोर येत आहे. २० मतदारसंघात शरद पवार ज्या तरूण-युवकांना मैदानात उतरवणार आहेत, यापैकी काहींची नावं जाहीर झाली आहेत तर काही ठिकाणी शरद पवार चाचपणी करत आहेत. विधानसभेतील या २० मतदारसंघात अहेरी, आष्टी, दिंडोरी, गेवराई, श्रीवर्धन, हडपसर, पुसद, बारामती यासारख्या बड्या मतदारसंघाचा समावेश आहे.
Published on: Jul 31, 2024 06:07 PM
Latest Videos