Sharad Pawar : 2024 विधानसेभेच्या रिंगणात शरद पवारांची 'यंग बिग्रेड', कोणत्या तरूण चेहऱ्यांना उमेदवारी?

Sharad Pawar : 2024 विधानसेभेच्या रिंगणात शरद पवारांची ‘यंग बिग्रेड’, कोणत्या तरूण चेहऱ्यांना उमेदवारी?

| Updated on: Oct 28, 2024 | 11:00 AM

होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात सध्या अनेक तरूण चेहरे उतरलेले दिसत आहेत. अशातच सर्वाधिक तरूण चेहेरे शरद पवार यांनी यंदाच्या विधानसभेच्या रिंगणात उतरवले आहेत. बघा कोण आहेत शरद पवारांच्या यंग ब्रिगेडमध्ये ज्यांना संधी देण्यात आली आहे.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांची यंग ब्रिगेड निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. यंदाच्या निवडणुकीत शरद पवार गट राष्ट्रवादीकडून विधानसभेसाठी तिकीट दिलेल्या उमेदवारांमध्ये तरूण चेहऱ्यांची संख्या अधिक आहे. यंदाची निवडणूक महत्त्वाची असल्याने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने नव्या तरूण चेहऱ्यांना संधी दिल्याचे पाहायला मिळत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत जाहीर कऱण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील उमेदवार सर्वात तरूण आहेत. कवठे महांकाळ येथून रोहित पाटील (वयवर्ष २५), अकोले येथून अमित भांगरे (२८), कारंजा मतदारसंघातून ज्ञायक पाटणी (२७), मोहोळ मतदारसंघातून सिद्धी कदम (२५), आष्टी मतदारसंघातून मेहबूब शेख (३८), बारामती या मतदारसंघातून युगेंद्र पवार (३२), अणुशक्तीनगर मतदारसंघातून फहाद अहमद (३२) आणि कर्जत जामखेड या मतदारसंघातून रोहित पवार (३९) अशा उमेदवारांचा समावेश आहे.

Published on: Oct 28, 2024 11:00 AM