आगामी काळात पक्षानं Rohit Patil यांना संधी द्यायला हवी : Rohit Pawar

आगामी काळात पक्षानं Rohit Patil यांना संधी द्यायला हवी : Rohit Pawar

| Updated on: Jan 20, 2022 | 3:30 PM

दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांची राजकारणात दणक्यात एन्ट्री झाली आहे. सांगलीतील कवठेमहंकाळमध्ये रोहित पाटील यांनी बाजी मारली आहे. रोहित पाटील यांना नेत्रदीपक विजय मिळाल्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांची राजकारणात दणक्यात एन्ट्री झाली आहे. सांगलीतील कवठेमहंकाळमध्ये रोहित पाटील यांनी बाजी मारली आहे. रोहित पाटील यांना नेत्रदीपक विजय मिळाल्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्वत: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी रोहित पाटील यांचं ट्विटरवरून अभिनंदन केलं आहे. शाब्बास रोहित… खूप खूप अभिनंदन, अशा शुभेच्छा रोहित पवार यांनी दिल्या आहेत.

राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी नगरपंचायत निवडणुकीची सर्व सूत्रे हाती घेतली होती. रोहित पाटील यांनी जोरदार भाषणं करत विरोधकांना नामोहरण केलं होतं. या निवडणुकीत रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलला 10, तर शेतकरी विकास पॅनलला 6 तर अपक्ष 6 जागांवर विजयी झाले आहेत. या विजयानंतर आर. आर. पाटील यांच्या मातोश्री आणि रोहित पाटील यांच्या आजी भागिरथी पाटील यांनी रोहित यांचं औक्षण केलं. हाच फोटो ट्विट करत रोहित पवार यांनी रोहित पाटील यांचं अभिनंदन केलं आहे. शाब्बास रोहित… खूप खूप अभिनंदन, अशा शुभेच्छा रोहित पवार यांनी रोहित पाटील यांना दिल्या आहेत.