Special Report | पवारांनी जातीचं विष पेरलं, राज ठाकरेंच्या दाव्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक
राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राज्यात जातीय अस्मितेचा मुद्दा पुढे आला, असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. त्यावर राष्ट्रवादीने पलटवार केला आहे. (nawab malik slams Mns Chief Raj Thackeray to statement of Caste Politics In Maharashtra)
मुंबई: राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा पुढे आला, असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. त्यावर राष्ट्रवादीने पलटवार केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे. त्यांच्या ठरलेल्या धोरणानुसार आम्ही राजकारण करतो. मात्र राज ठाकरे यांना हे माहीत नसावे किंवा जातीव्यवस्थेचा इतिहास माहित नसावा म्हणून ते अशाप्रकारचे वक्तव्य करत आहेत, असा पलटवार राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. तर राज ठाकरे यांनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरें यांचं साहित्य वाचावं, मग त्यांना जातीवाद कळेल, असा टोला राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी लगावला आहे. (NCP slams Mns Chief Raj Thackeray on statement of Caste Politics In Maharashtra)
राज ठाकरे यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केला होता. हिंदुत्वाच्या राजकारणाला शह देण्यासाठी महाराष्ट्रात जातीचं राजकारण सुरू झालं आहे का?, असा सवाल राज यांना करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप केला होता. त्यावर राष्ट्रवादीने हा पलटवार केला आहे.
मनुवादी व्यवस्थेमुळेच वर्णव्यवस्था
या देशात मनुवादी व्यवस्थेमुळे वर्णव्यवस्था निर्माण झाली आणि त्याअंतर्गत जातीव्यवस्था उभ्या राहिल्या. मात्र यामुळे जातीआधारावर अनेक वर्षे लोकांवर अन्याय होत राहिला हे राज ठाकरे यांना बहुतेक माहीत नसावे, अशी टीका मलिक यांनी केली.
ते वक्तव्य अज्ञानातून
छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी जातीव्यवस्था नष्ट करण्याचे काम केले. समता मुलक समाज घडवण्याचं काम केलं हेही राज ठाकरे यांना माहीत नसावे असा उपरोधिक टोला लगावतानाच राज ठाकरे यांनी अज्ञानातून हे वक्तव्य केले असावे असा चिमटाही त्यांनी काढला.
राज नेमकं काय म्हणाले होते?
राज्यात आधीपासूनच जाती होत्या. पण जाती अभिमान बाळगण्यापुरत्याच होत्या. पण गेल्या 20 वर्षापासून चित्रं बदललं. लोक जातीचा अभिमान बाळगण्याबरोबरच इतर जातींचा तिरस्कार करू लागले आहेत. हे सर्व राजकीय स्वार्थातून होत आहे. जातीचा मुद्दा हा तर नेत्यांची आयडेंटीटी होत आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीचा मुद्दा सर्वार्थाने मोठा झाला, असं राज म्हणाले होते.
संबंधित बातम्या:
शरीरसुखाची मागणी केल्याची महिलेची गंभीर तक्रार; संजय राठोड मीडियासमोर आले, म्हणाले…
सुप्रिया सुळे का म्हणाल्या देशात मोठा सोशल चेंज हवा?; वाचा सविस्तर
मुख्यमंत्री की राज्यपाल, कोण जिंकणार? 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत आज मोठा निर्णय
(NCP slams Mns Chief Raj Thackeray on statement of Caste Politics In Maharashtra)