'राऊत साहेब तुम्ही तुमच्या पक्षाची काळजी करा', कुणी दिला खोचक सल्ला?

‘राऊत साहेब तुम्ही तुमच्या पक्षाची काळजी करा’, कुणी दिला खोचक सल्ला?

| Updated on: Jun 12, 2023 | 12:24 PM

VIDEO | राष्ट्रवादीच्या नेत्यानं सामनातील अग्रलेखावरून संजय राऊत यांच्यावर केली सडकून टीका

मुंबई :संजय राऊत साहेब तुम्ही तुमच्या पक्षाची काळजी करा’, असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी सामनातील अग्रलेखावर टीका केली आहे. संजय राऊत साहेब तुम्ही जर तुमच्या पक्षाची काळजी केली असती तर तुमच्यावरती अग्रलेख लिहिण्याची वेळ आली नसती, असे म्हणत सूरज चव्हाण यांनी संजय राऊतांवर खोचक टोला लगावला. आमची भाकरी फिरली की नाही हे माहिती नाही, पण तुमची भाकरी आणि चुल ज्याने पळून नेले त्याच्यावर जास्त लक्ष द्या, असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली. यासंदर्भात आजच्या सामनातून भाष्य करण्यात आले असून थेट शरद पवार यांना विचारणा करण्यात आली आहे. भविष्यातील राजकारणाचा विचार करून शरद पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काही प्यादी हलवली आहेत. नव्या रचनेत कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी आली आहे. दुसरे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल मध्य प्रदेश, गुजरात, गोवा, राजस्थान वगैरे प्रदेश पाहतील. शरद पवारांनी भाकरी फिरवली नसून आता कोठे चुलीवर टाकली आहे. भाकरी कच्ची राहू नये म्हणून ती फिरवावीच लागते. आधीची भाकरी करपल्याने नवी भाकरी थापली असेल तर वाट पाहावी लागेल, असे सामनातून म्हटले आहे.

Published on: Jun 12, 2023 12:18 PM