ईडी नोटीशीवर राऊत म्हणाले, आम्ही यातून गेलोय... जयंत पाटील खंबीरपणे तपासाला...

ईडी नोटीशीवर राऊत म्हणाले, आम्ही यातून गेलोय… जयंत पाटील खंबीरपणे तपासाला…

| Updated on: May 22, 2023 | 11:52 AM

जयंत पाटील आज ईडीच्या कार्यालयात हजर राहून चौकशीला सामोरे जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ईडीने दुसऱ्यांदा समन्स बजावले आहे. या समन्समध्ये जयंत पाटील यांना आज सोमवारी (22 मे रोजी) चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. जयंत पाटील आज ईडीच्या कार्यालयात हजर राहून चौकशीला सामोरे जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात असल्याचे म्हणत भाजपवर हल्लाचढवला आहे. तसेच केंद्रीय यंत्रणा सूडाच्या भावनेतून चौकशी करत आहेत. आम्ही या सगळ्यातून गेलो आहोत, यापुढेही जावे लागू शकते. जयंत पाटील हे खंबीर नेते आहेत. ते या दबावापुढे झुकणार नाहीत. जयंत पाटील हे खंबीर आणि स्वाभिमानी नेते आहेत. त्यांनी आज ताठ मानेने ईडीच्या चौकशीला सामोरे गेले पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

Published on: May 22, 2023 11:52 AM