Jayant Patil : ‘कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी…’, शरद पवार गटाच्या बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या बैठकीत जयंत पाटील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील मंत्र्यांची भेट घेतलेल्यांना जयंत पाटील यांनी चांगलंच सुनावले आहे.
‘कोणला तिकडे जायचे असेल तर त्यांनी जरूर जावं’, असं वक्तव्य शरद पवार गट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या बैठकीत जयंत पाटील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील मंत्र्यांची भेट घेतलेल्यांना जयंत पाटील यांनी चांगलंच सुनावले आहे. पहिल्या रांगेत बसलेले अनेकजण तिकडे हारगुच्छ देऊन आलेत, असं म्हणत जयंत पाटील हे शरद पवार गटाच्या बैठकीत आपल्याच नेत्यांवर भडकल्याचे पाहायला मिळाले. मुंबईत दोन दिवसीय शरद पवार गटाची बैठक सुरू आहे. नुकत्याच राज्यात झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर चिंतन आणि मंथन करण्यासाठी शरद पवार गटाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. काल या बैठकीचा पहिला दिवस होता. याच पहिल्या दिवशी शरद पवार गट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आक्रमक भूमिका पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटातील काही आमदार आणि खासदार अजित पवार गटात जाणार अशा सुरू असलेल्या चर्चांवर जयंत पाटील यांनी भाष्य केले. या मुद्द्यावर बोलताना जयंत पाटील यांची आक्रमक भूमिका पाहायला मिळाली.