पवार बाप-लेकीला सोडून अजितदादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं शरद पवारांच्या खासदारांना थेट प्रपोजल?
दिल्लीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार गटातील खासदारांना एक प्रस्ताव दिला होता. यावेळी सुनील तटकरेंनी बाप-लेकीला सोडून अजित पवार यांच्यासोबत या, अशी ऑफरच दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय
बाप-लेकीला सोडून अजित पवार यांच्यासोबत या, अशी ऑफर सुनील तटकरे यांनी शरद पवार गटातील खासदारांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. पण शरद पवार गटातील खासदारांनी कुठलीही ऑफर आली नसल्याचे म्हटलं आहे. मात्र दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना ऑफर आल्याचे म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार गटातील खासदारांना एक प्रस्ताव दिला होता. यावेळी सुनील तटकरेंनी बाप-लेकीला सोडून अजित पवार यांच्यासोबत या, अशी ऑफरच दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. मात्र शरद पवार यांच्या खासदारांनी अजित पवारांसोबत जाण्याचा प्रस्ताव फेटाळला. सुनील तटकरे यांच्या प्रस्तावावरून सुप्रिया सुळे सनिल तटकरेंवर संतापल्याचेही माहिती आहे. दरम्यान, सुप्रिया सुळेंनी प्रफुल्ल पटेल यांना फोन करून नाराजी व्यक्त केली. असा विचार येतोच कसा? असा सवाल करत सुप्रिया सुळेंकडून सुनील तटकरे यांच्याबाबत प्रफुल्ल पटेल यांच्याकडे नाराजी व्यक्त केली, असंही सूत्रांकडून कळतंय. पण ऑफर आली की नाही हे सांगण्यावरून शरद पवार गटातूनच दोन प्रतिक्रिया येत असल्याचे दिसतेय.